चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले
स्वरश्री गीत गायन स्पर्धा २०२६नियम व अटी
१) संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजी यांनी गायलेल्या किंवा स्वरबद्ध केलेल्या (‘गीत रामायणा’ वगळून) कोणत्याही भाषेतील गाण्याचा एकच अंतरा सादर करता येईल. २) गाणे सादर करण्यासाठी तबला, पेटी, व सिंथेसाइझरची साथ संगत करणारे वादक संस्थेतर्फे पुरवले जातील. ३) स्वताचे वादक आपापल्या स्वखर्चाने आणू शकता ४) स्पर्धेचे अंतिम निकालाचे अधिकार केवळ परीक्षकांकडे असतील. या संदर्भात कोणताही हस्तक्षेप स्पर्धकांनी, नातेवाईकांनी / समर्थकांनी करू नये. ५) एखाद्या वयोगटात स्पर्धक कमी असल्यास जाहीर केलेली सर्व बक्षिसे बहाल केलीच पाहिजे अशी अट नाही. ६) स्पर्धेत भाग घेण्यास कोणत्याही धर्माची अथवा ज्ञातीची अट नाही. व्यावसाईक गायक / गाईकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही. ७) १२ ते १८ ह्या वयोगटात त्याहूनही लहान वयाच्या स्पर्धकांना सहभागी होता येईल परंतु त्यांचे मूल्यमापन हे ह्या वयोगटातील स्पर्धकांबरोबरच केले जाईल. ८) स्पर्धेत भाग घेण्यासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य:– संस्थेच्या कार्यालयात (सकाळी १० ते १२ व सं. ते ८ वाजेपर्यंत) फॉर्म स्वीकारले जातील. – संस्थेच्या इंटरनेट संकेत स्थळा वरुन फॉर्म भरून (स्पर्धा शुल्क क्युआर कोड स्कॅन करून भरावे) – https://vileparle.ckp.in/halls/swarshree ९) केवळ प्रथम नोंदणी केलेल्या १०० स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभागी होता येईल. संपूर्ण नोंदणी शुल्क यशस्वी पणे भरल्याचा दिनांक आणि वेळ, या अनुसार नोंदणी क्रम गृहीत धरला जाईल. १०) स्पर्धेला येताना आपले आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळख पत्र(पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायविंग लाईसेन्स) सोबत आणणे बंधनकारक आहे.११) कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील.
स्वरश्री गीत गायन स्पर्धेत भाग घेण्यासाठीचे वर नमूद केलेले सर्व नियम मी वाचले आहेत आणि ते मला मान्य आहेत.