Register for Shree Ganapati Idol Creation Workshop

मर्यादित जागा उपलब्ध, लगेच रजिस्टर करा…

गणेश चतुर्थीला श्रींच्या पूजेत, “श्री. गणेश मूर्ती आपण आपल्या हाताने शाडू पासून बनवत आहोत अशी कल्पना करा.” असे येते किंवा बरेच पूजा सांगणारे सांगतात. जर आम्ही आपल्याला सांगितले की अशी नुसती कल्पना करण्यापेक्षा श्री. गणपतींची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवायची संधी आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत तर! ही नक्कीच चेष्टा नाही. बऱ्याच जणांची हौस आणि सुप्त इच्छा मूर्ततेत आणण्यासाठी, चांद्रसेनिय कायस्थ प्रभू मंडळ, विलेपार्ले आणि दी आर्ट्स मंत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करत आहोत, शाडूच्या मातीची श्री. गणपती मूर्ती स्वतःच्या हाताने बनवण्याचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा, येत्या रविवारी दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, दी आर्ट्स मंत्राच्या जतिन किशोर बाविस्कर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली*. कार्यशाळेसाठी नोंदणी देणगी मूल्य ₹१२००/- भरून खालील फॉर्म भरून जागेच्या अभावा मुळे मर्यादित प्रशिक्षणार्थींनाच कार्यशाळेत भाग घेता येईल.

कार्यशाळेकरिता लागणारे मूर्ती बनवण्याचे साहित्य दी आर्ट्स मंत्राच्या वतीने देण्यात येईल. शाडूची माती वाळायला काही दिवस लागत असल्याने मूर्ती रंगवण्या बद्दल थोडेफार मार्गदर्शन होईल पण मूर्ती रंगवण्या साठीचे साहित्य आणि कृती असणार नाही. आपल्याला नोंदणी नंतर फक्त, कर्णिक सभागृह, तळ मजला, तेजपाल स्कीम रोड क्रमांक ४, विलेपार्ले (पूर्व) इथे (आपल्या दुपारच्या खाऊ डब्यासहीत) उपस्थित राहायचे आहे.

✨ इथे तुम्ही शिकणार आहात –
🪔 शुद्ध शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडवणे.
🪔 कोणत्याही साच्याशिवाय मूर्ती तयार करणे.
🪔 POP आणि रासायनिक पदार्थांशिवाय पर्यावरणपूरक बाप्पा साकारणे.
🪔 अनुभवी मार्गदर्शनाखाली मूर्तीला अंतिम रूप देणे.

📅 ३० ऑगस्ट २०२६ | रविवार
⏰ सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.००
📍 कर्णिक सभागृह, विलेपार्ले (पूर्व)
💰 देणगी मूल्य ₹१२००/-

👨‍👩‍👧 सर्व वयोगटांसाठी खुली | १२ वर्षांखालील मुलांसोबत पालक आवश्यक.

⚡ जागा मर्यादित आहेत आणि आता काहीच जागा शिल्लक आहेत..

लगेचच नोंदणी करा

Chandraseniya Kayastha Prabhu (CKP) Mandal, Vile Parle in association with The Art Mantra is organizing Shree Ganapati Idol Creation Workshop. Jatin Baviskar will be conducting the workshop and it will be held on Sunday, 30-August-2026 from 9.30 am to 5 pm at Karnik Sabhagruha on Ground Floor of CKP Mandal, Vile Parle, Tejpal Scheme Road Number 4, Vile Parle (East), Mumbai – 400057. Kindly make payment of ₹1200/- and then fill up the following form to register for the workshop. Only first 50 successfully paid and duly registered entries shall be enrolled for the workshop.